Home > Political > फडणवीसांना नागपूरच्या बाहेर कुणी ओळखत नव्हतं तेव्हा पुणे प्रगतीपथावर होतं: रुपाली चाकणकर

फडणवीसांना नागपूरच्या बाहेर कुणी ओळखत नव्हतं तेव्हा पुणे प्रगतीपथावर होतं: रुपाली चाकणकर

फडणवीसांना नागपूरच्या बाहेर कुणी ओळखत नव्हतं तेव्हा पुणे प्रगतीपथावर होतं: रुपाली चाकणकर
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा 22 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात अनेक ठिकाणी नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना देणारे होर्डिंग्स भाजपकडून लावण्यात आले आहे. यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला आघडीच्या प्रदेशअध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी फडणववीसांवर निशाणा साधत खोचक टीका केली आहे. फडणवीसांना नागपूरच्या बाहेर कुणी ओळखत नव्हतं तेव्हा पुणे प्रगतीपथावर होतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

चाकणकर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नागपूरच्या बाहेर कुणी ओळखत नव्हते तेव्हा पुणे शहर सर्वाधिक जलदगतीने प्रगती करणारे महानगर म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या दूरदृष्टीतून नव्या पुण्याची निर्मिती झाली. एवढच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या गुजरातमधील (gujarat) लोकं सुद्धा कामासाठी पुण्यात येऊन राहतात, असा टोला .रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भाजपला लगावला आहे.





पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, जेव्हा २०१७ मध्ये पुण्याला देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नावाची ओळख झाली, तेव्हापासून पुणेकरांची दयनीय अवस्था सुरु झाली असून, त्यावेळी केलेल्या मतदानाचा पश्चाताप पुणेकरांना आता होतोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत असून, त्यांनी प्रभावी विरोधीपक्षनेते पद निरंतर निभवावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारू नयेत असा खोचक टोला चाकणकरांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

Updated : 20 July 2021 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top