"नया मुल्ला जोर से बांग देता है";चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्य्यावर निशाणा
X
मुंबई: राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत, आपल्या शेर शायरी अंदाजात समाचार घेतला आहे. चित्रा वाघ यांची अवस्था म्हणजे, "नया मुल्ला जोर से बांग देता है" अशी झाली असल्याचा खोचक टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे. मी वीस वर्षे राष्ट्रवादी पक्षात काम केले आहे.
त्यामुळे निश्चितपणे विश्वास आहे कि, शरद पवारांच्या विचाराने चालणारी राष्ट्रवादी आता राहिली नसल्याचा माझा व्यक्तीक मत असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देत चाकणकर म्हणाल्यात की, "उभ्या महाराष्ट्राला माहित आहे ताईंनी पक्ष कोणत्या कारणासाठी सोडला, त्यामुळे 'विचार-आचार' असे जड शब्द त्यांनी वापरू नयेत. आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी ह्या आयात नेत्याना पवार साहेबांवर टिका करावी लागते. त्यामुळे, ताईंची अवस्था म्हणजे, "नया मुल्ला जोर से बांग देता है" अशी झाली असल्याची' टीका चाकणकर यांनी केली.
चित्रा वाघ आणि चाकणकर यांच्यातील शाब्दिक चकमक काही नवीन नाही. त्यामुळे ह्या दोन्ही नेत्या आपल्या पक्षाची बाजू मांडताना विरोधकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातील सोशल वॉर अधिकच वाढला आहे.