Home > Political > प्रतिष्ठितांवर शिंतोडे उडवून स्वत:ला 'वाघ' समजणाऱ्या लांडग्यांचा उदरनिर्वाह चालतोय

प्रतिष्ठितांवर शिंतोडे उडवून स्वत:ला 'वाघ' समजणाऱ्या लांडग्यांचा उदरनिर्वाह चालतोय

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला?

प्रतिष्ठितांवर शिंतोडे उडवून स्वत:ला वाघ समजणाऱ्या लांडग्यांचा उदरनिर्वाह चालतोय
X

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्यावर होणाऱ्या लैगीक आरोपांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. गुरुवारी 1 एप्रिलला राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांच्यावर एका महिलाने तृप्ती देसांईंच्या मदतीने पुण्यात पत्रकार घेत बलात्काराचा आरोप केला.

यावर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत प्रतिक्रीया दिली आहे. यात रुपाली चाकणकर यांनी "प्रतिष्ठित व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा अनेकांनी व्यवसायच मांडला आहे. या अशा लोकांच्या व्यवसायावरच स्वतःला वाघ समजणाऱ्या अनेक लांडग्यांचा राजकीय उदरनिर्वाह चालू आहे." असं म्हटलं आहे.

दरम्यान, आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले. त्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले. आणि, आता राजेश विटेकर. यातील मुंडे आणि शेख यांच्यावर जेव्हा बलात्काराचे आरोप झाले तेव्हा विरोधी पक्षाने सरकारवर प्रचंड टीका केली होती.

Updated : 3 April 2021 11:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top