Home > Political > अंधश्रद्धेविरुद्ध रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला तीव्र विरोध

अंधश्रद्धेविरुद्ध रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला तीव्र विरोध

अंधश्रद्धेविरुद्ध रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला तीव्र विरोध
X

राज्यात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा उफाळून येत असल्याचे चित्र सतत घडणाऱ्या घटनांमधून समाजासमोर येत आहे. यामध्ये महिला तसेच लहान बालके यांचा नाहक बळी जात आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरून आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती , सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पीडितेच्या पती , सासू , सासरे यांना अटक झाली होती आणि आज फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आले आहे अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा आहे हे माझं मत आहे आणि हे कारण समूळ नष्ट करणे ही तुमची , आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी असल्याचे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असून अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे व समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले . महाराष्ट्र राज्य महिला आयोगानी याची गंभीर दखल घेतली आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण मी अशा मुद्यांवर जनजागृती करण्याचे आव्हान करीत आहे.

Updated : 22 Aug 2022 9:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top