Home > Political > अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रीया

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रीया

“कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..” अमृता फडणवीसांचे नवीन गाणे, रोहित पवार म्हणतात “अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!”

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रीया
X

जागतीक महिला दिनानिमीत्त अमृता फडणवीस यांनी नाट्यसंगीतावर आधारीत नवीन गाण्याचा 28 सेकंदाचा व्हिडीओ ट्वीट केला. या गाण्याचे बोल "कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.." असे आहेत.

अमृता फडणवीस यांचे हे ट्वीट रिट्वीट करत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. रोहित पवारांनी "काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!" असं म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये "कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी! हे प्रेरणादायी गीत नक्की ऐका" असं म्हटलं आहे.


Updated : 9 March 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top