Home > Political > रोहिणी खडसेंचा एकनाथ शिंदे गटाला सल्ला.. ?

रोहिणी खडसेंचा एकनाथ शिंदे गटाला सल्ला.. ?

रोहिणी खडसेंचा एकनाथ शिंदे गटाला सल्ला.. ?
X

"आयुष्यात एकच नियम पाळा ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना हरवण्याची स्वप्ने कधीच पाहू नका.." हे ट्विट आहे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांचे. नुकत्याच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना संधी मिळाली आणि ते निवडून देखील आले. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली होती. व त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रीपद देखील मिळणार अशा चर्चा सुरू होण्याअगोदरच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी बंड केले. शिंदे आपल्यासोबत 40 हून अधिक आमदार घेऊन पहिला सुरतला पोहोचले आणि त्या नंतर थेट गुवाहाटीला. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार टिकणार की पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सगळ्या घडामोडी घडत असताना आज रोहिणी खडसे यांचे एक ट्विट चर्चेत आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, "आयुष्यात एकच नियम पाळा ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना हरवण्याची स्वप्ने कधीच पाहू नका.."

त्यांनी केलेल्या या ट्विटची चर्चा सर्वत्र तर आहेच. पण त्याच ट्विटचे अनेक राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहिनी खडसे या सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या नेत्या आहेत त्याचबरोबर त्या जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष म्हणून सुद्भा त्यांनी काम केले आहे.

Updated : 26 Jun 2022 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top