Home > Political > महागाईच्या विरोधात रोहिणी खडसे यांनी काढली अंतयात्रा

महागाईच्या विरोधात रोहिणी खडसे यांनी काढली अंतयात्रा

महागाईच्या विरोधात रोहिणी खडसे यांनी काढली अंतयात्रा
X

जळगाव: पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर व चारचाकी गाडीची प्रतीकात्मक अंतयात्रा परिवर्तन चौकातून काढण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची उपस्थीती पाहायला मिळाली.

घरगुती गॅस सिलेंडरमागे तब्बल 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून, कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल 100 रुपायांच्या पुढे गेले आहे. या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आज जळगावात रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत अंतयात्रा काढली.

अंत्ययात्रेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडन केले, त्यानंतर परिवर्तन चौकामध्ये अंत्ययात्रेतील तिरडी खाली ठेवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत रस्ता रोको काही काळ करण्यात आला. यावेळी रोहिणी खडसे यांनी तिरडीला हार अर्पण करत, सिलेंडर गॅस तिरडीला खंदा दिला.

पुढे तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला, मुक्ताईनगर च्या तहसीलदार शेता संचेती यांनी गेटवर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आंदोलनकर्ते गेटवरती घोषणाबाजी देत ठिय्या मांडून बसले होते. आंदोलन चिघळण्याचे लक्षात येतात श्वेता संचेती यांनी गेटवर येऊन रोहिणी खडसे यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले.

Updated : 5 July 2021 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top