Home > Political > अरे पेट्रोल पण १०५ वर पोहचलं; पेट्रोल दरवाढीवरून रोहणी खडसेंचा भाजपला खोचक टोला

अरे पेट्रोल पण १०५ वर पोहचलं; पेट्रोल दरवाढीवरून रोहणी खडसेंचा भाजपला खोचक टोला

अरे पेट्रोल पण १०५  वर पोहचलं; पेट्रोल दरवाढीवरून रोहणी खडसेंचा भाजपला खोचक टोला
X

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमंतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक राज्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० च्या वर गेले आहे. त्यात पेट्रोलने महाराष्ट्रात चक्क १०५ चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसे (Rohini Khadse ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीत १०५ विजयी आमदारांचे संख्याबळ गाठले होते. निकालानंतर सर्वात मोठा विजय पक्ष असूनही, महाविकास आघाडी स्थापन झाल्याने, भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पेट्रोल दरवाढीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, अरे पेट्रोल पण पोहोचले की १०५, बहुधा आता तिथंच थांबेल ते... असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.





पेट्रोल-डीझेल प्रमाणेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमंतीमध्ये सुद्धा दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमागे तब्बल २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत ८४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांच आर्थिक बजेट कोलमडून जाणार आहे.

Updated : 3 July 2021 6:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top