Home > Political > विधानपरिषद निवडणूक: पंकजा मुंडे नाराज आहेत का?

विधानपरिषद निवडणूक: पंकजा मुंडे नाराज आहेत का?

विधानपरिषद निवडणूक: पंकजा मुंडे नाराज आहेत का?
X

औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीत आपल्या समर्थकाला उमेदवारी दिली नसल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची बोलले जात आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे. मी नाराज असल्याचे काही कारण नाही. पक्षाचा एक उमेदवार ठरला असून त्यानुसार आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. माझे समर्थक हे सुद्धा भाजप कार्यकर्ते असून, त्यांची मी समजूत काढेल असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपकडून शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा भाजप नेते आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक समजले जाणारे प्रवीण घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने भाजपमधील बंडखोरी समोर आली आहे. तर आपल्याला पक्षाकडूनच उमेदवारी दाखल करण्याचा सूचना मिळाल्या असल्याचं घुगे यांनी दावा केला आहे. त्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी आता आपले पत्ते खोलाय़ला सुरुवात केली आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


Updated : 12 Nov 2020 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top