Home > Political > एकनाथ खडसेंना इडीची नोटीस, रक्षा खडसे सासऱ्यांच्या भेटीला

एकनाथ खडसेंना इडीची नोटीस, रक्षा खडसे सासऱ्यांच्या भेटीला

एकनाथ खडसेंना इडीची नोटीस, रक्षा खडसे सासऱ्यांच्या भेटीला
X

एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची नोटीस आल्यामुळे एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे आज सकाळी त्यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी जळगावमधील घरी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी मुंबईला जाणार आहेत. याबाबत जळगावात एकनाथ खडसेंना विचारलं असता लग्नाला जातोय येता का ? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदींविरोधात घोषणाबाजी केली. खडसेंना ज्या भोसरी प्रकरणात ईडीची नोटीस बजावलीय, त्या प्रकरणी यापूर्वीच चारवेळा चौकशी झालीय. तरीही पुन्हा ईडीची नोटीस देऊन भाजप राजकारण करतंय असा आरोप यावेळी केला. नोटीस तातडीनं मागे घेण्याची मागणीही केली आहे.

Updated : 2020-12-28T20:39:25+05:30
Next Story
Share it
Top