Home > Political > 'माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच..'' शर्मिला ठाकरे

'माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच..'' शर्मिला ठाकरे

माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच.. शर्मिला ठाकरे
X

महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा प्रश्न राज्यात नेहमीच चर्चिला जातो. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त करत "माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील" असं वक्तव्य केलं आहे. त्या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र काय एवढा मागासलेला नाही. महाराष्ट्राची हद्द सोडली तर सगळ्या राज्यांत सगळे रस्ते गुळगुळीत आहेत. आपले राजकारणीच का मुद्दाम रस्ते करत नाहीत ? तेवढे तरी नीट करा. असा संताप शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तर आपण देशाला सर्वात जास्त महसूल देतो तर निदान रस्ते तर चांगले करा असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. दरम्यान, माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील असं देखील ठाकरे म्हणाल्या आहेत. तरुण पिढी राजकारणात आलीच पाहिजे.

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या संदर्भात देखील शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकरणात तरुण पिढी आलीच पाहिजे. तरुण पिढीकडे नवीन चांगले विचार असतात जुन्या विचाराने ते चालत नाहीत. त्यांच्या भरपूर अपेक्षा असतात त्यांच्या वयाच्या मुलांना काय हवं असत हे त्यांना माहित असत. जवळपास 60 70 टक्के मतदार तरुण आहेत त्यामुळे या मतदारांना काय हवंय हे या पिढीला कळतं म्हणून तरुण पिढीने राजकारणात यायला हवं असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.

Updated : 22 Aug 2022 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top