Home > Political > राहुल गांधींच्या नावावरून काय वाद होता? | Rahul Gandhi

राहुल गांधींच्या नावावरून काय वाद होता? | Rahul Gandhi

राहुल गांधींच्या नावावरून काय वाद होता? | Rahul Gandhi
X

काँग्रेस नेते राहुल गांधी 7 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. काल येथे केंब्रिज विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये त्यांचे भाषण देखील झाले. या भाषणादरम्यान त्यांनी भारत जोडो यात्रेचे अनुभव शेअर केले. ते नव्या लूकमध्ये केंब्रिजला पोहोचले आहेत. त्यांच्या नव्या लुक ची आता समाजमाध्यमांवर चर्चा आहे. एका चाहत्याने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहुल एकदम सेट दाढी, कोट आणि टायमध्ये दिसत आहेत. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता राहुल गांधी यांनी आपला लूक बदलला आहे. मागच्या काळात राहुल गांधी यांची अनेक कारणांवरून चर्चा झाली. त्यात त्यांच्या टी-शर्ट पासून त्याचे शूज त्यांची दाढी इतकाच नाही तर ते त्यांना ज्या प्रकारे महिला भेटत होत्या त्यावरून देखील त्यांना ट्रोल करण्यात आले. मागच्या काही महिन्यात राहुल गांधी यांच्या वाढलेल्या दाढीची मोठी चर्चा होती आता त्यांनी नव्या लुक मध्ये ट्रीम दाढी ठेवली आहे. त्यामुळे आता त्यांना नव्याने ट्रोल केलं जाईल यात काही शंका नाही.

राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात का गेले आहेत..?

राहुल गांधी यांचे आज केंब्रिज विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये भाषण झाले. 16 फेब्रुवारी रोजी केंब्रिज विद्यापीठातील भाषणावर राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. ते म्हणाले होते, मी भाषण देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आंतरराष्ट्रीय समस्या, आंतरराष्ट्रीय संबंध, डेटा आणि लोकशाही या विषयांवर मी जगातील काही सर्वोत्कृष्ट लोकांशी संवाद साधणार आहे याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले होते. त्यानुसार अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील आपल्या भाषणात मांडले.

या आधी देखील त्यांनी केंब्रिज मध्ये भाषण केले होते..

राहुल गांधी यांनी यापूर्वी मे २०२२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली होती. येथे त्यांना आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलायचे होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार संसद आणि निवडणूक आयोगासारख्या देशातील घटनात्मक संस्थांना त्यांचे काम करू देत नसल्याचं ते म्हणाले होते त्यानंतर त्यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला होता. देशाच्या पंतप्रधानांवर असे वक्तव्य परदेशात का केले? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी यावरून बराच गदारोळ झाल्याचं आपण पाहिलं..

राहुल केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी होते..

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातुन राऊल विंची या नावाने शिक्षण घेतले. त्यांनी 1995 मध्ये डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमफिल केली आहे. वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता सतावत असल्याने हे नाव बदलावे लागले. राहुल यांच्या पदवीवरून वाद सुरू झाला तेव्हा केंब्रिजचे कुलगुरू प्रा. अॅलिसन रिचर्डनेही एक पत्र लिहून राहुलने राऊल विंचीच्या नावाने पदवी घेतल्याचे सांगितले.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपली. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने सुमारे 3 हजार 570 किलोमीटरचे अंतर कापले आहे. एकूण 146 दिवसांच्या या प्रवासात राहुल यांनी 14 राज्यातुन जात पूर्ण केला.

Updated : 4 March 2023 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top