Home > Political > राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले, 9 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले, 9 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Rahul Gandhi reached Delhi to meet the victim's family

राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले, 9 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
X

दिल्लीतील 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी राहुल गांधी यांनी मृत पीडितेच्या पालकांशी चर्चा करत त्यांना धीर देण्याचे काम केले. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा पिडीत मुलीच्या कुटुंबाची भेट घेणार आहे.

प्रकरण काय आहे..

एक 9 वर्षीय मुलगी रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता जुन्या नांगल स्मशानभूमीत पिण्याच पाणी आणण्यासाठी गेली होती, मात्र ती परत न आल्याने तिच्या आईने शोधाशोध केली. दरम्यान, मुलगी स्मशानभूमीच्या आत मृत अवस्थेत पडल्याचे तिच्या आईला समजले. मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, आरोपीने ही गोष्ट सांगितली की, जेव्हा मुलगी वॉटर कूलरमधून पाणी भरत होती, तेव्हा तिचा मृत्यू विजेमुळे झाला. आरोपीच्या सांगण्यावरून मुलीचे अंतिम संस्कार तिथे करण्यात आले. मात्र, गावकऱ्यांना माहिती मिळताच ते जमले आणि चितावर पाणी ओतून अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

तसेच असा आरोप सुद्धा करण्यात आला आहे की, स्मशानभूमीत असलेल्या पुजारीने आणि आणखी काही लोकांनी मुलीवर अत्याचार केला आहे. त्यांनतर विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला असल्याचा आरोप सुद्धा पिडीत कुटुंबातील लोकांनी केला आहे.

Updated : 4 Aug 2021 4:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top