Home > Political > राहुल गांधी यांचा पब मधील व्हिडिओ व्हायरल..राजकारण्यांनी खाजगी आयुष्य जगायचं नाही का?

राहुल गांधी यांचा पब मधील व्हिडिओ व्हायरल..राजकारण्यांनी खाजगी आयुष्य जगायचं नाही का?

राहुल गांधी यांच्या एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते एका पब मध्ये असल्याचं दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते नेपाळला त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी गेले असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे. पण एक प्रश्न मनात येतोच तो म्हणजे राजकारण्यांनी खाजगी आयुष्य जगायचं नाही का?

राहुल गांधी यांचा पब मधील व्हिडिओ व्हायरल..राजकारण्यांनी खाजगी आयुष्य जगायचं नाही का?
X

राहुल गांधी सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. ते आपल्या वयक्तिक कामासाठी नेपाळला गेले आहेत. सध्या तेथील एका पब मधील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते एका चिनी महिलेसोबत दिसत आहे. असं म्हंटल जात आहे की, हा नेपाळचा मधील LOD-Lord of Drinks आहे व त्यांच्यासोबत दिसणारी जी महिला आहे ती नेपाळमधील चीनच्या राजदूत यानकी आहेत. मात्र त्या नक्की कोण आहेत याबाबत कुठलीही सत्यता समोर आलेले नाही.



काही तासांनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्याने दिले स्पष्टीकरण

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बराच बेळ या व्हिडिओवर कुठल्याही काँग्रेसच्या किंवा राहुल गांधी यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नव्हती. नंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे की, राहुल गांधी हे नेपाळमध्ये त्यांच्या एका मित्राच्या लग्नाला गेले होते, नेपाळ मध्ये त्यांचा एक पत्रकार मित्रा आहे त्याच लग्न होतं. त्या लग्नासाठी ते तिथे गेले आहेत. मित्रपरिवार असणे किंवा लग्नसमारंभाला जाणे हा आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचं त्यांनी म्हंटल आहे..या देशात अजूनही लग्नाला जाणे गुन्हा नाही. कदाचित आजनंतर भाजप ठरवेल की, लग्नाला उपस्थित राहणे बेकायदेशीर आहे आणि मैत्री करणे हा गुन्हा आहे.

भाजप सतत हल्लेखोर

दुसरीकडे भाजप यावरून आक्रमक झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या या व्हिडिओ वरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Updated : 3 May 2022 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top