Home > Political > punjab election : भाजपच्या या महिला उमेदवाराला तर तिच्या घरच्यांनीही मत नाही दिलं

punjab election : भाजपच्या या महिला उमेदवाराला तर तिच्या घरच्यांनीही मत नाही दिलं

किरण कौर या उमेदवाराने निवडणूकीत कॉंग्रेसने गडबड केल्याचा आरोप केला आहे..

punjab election : भाजपच्या या महिला उमेदवाराला तर तिच्या घरच्यांनीही मत नाही दिलं
X

फोटो सौजन्य - NDTV

17 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे निकाल जाहिर झाले. कॉंग्रेसने पंजाबमधील सात महानगरपालिकांवर आपला पंजा रोवला. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि बठिंडा - हेही शहरातील मनपांचे गेल्या ५३ वर्षानंतरचे सर्वात आश्चर्यकारक निकाल असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

या सगळ्यांत गुरदासपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या उमेदवार किरण कौर यांनी कॉंग्रेसवर निवडणुकीत घोळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की "कुटुंबातील 15-20 लोकांनी मतदान केलं होते, परंतु त्यापैकी केवळ 9 मते मिळाली".

माध्यमांशी बोलताना किरण कौर म्हणाल्या की, "कॉंग्रेस पक्षाने माझी फसवणूक केली. कॉंग्रेसने चिन्हांची जागा बदलून ईव्हीएम बदललं. आमच्या गल्लीतील सर्व लोकांनी मला मतदान करण्याचे वचन दिले होतं. परंतु कोणीही माझ्या बाजूने मतदान केलं नाही."

या सोबतच किरण यांनी कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या कुटूंबाचा छळ केल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी सांगितलं की "कॉंग्रेसने मला ही सिट सोडण्यासाठी सांगीतलं होतं. मी निवडणूकीत पराभूत होवू शकत नाही. कॉंग्रेसने चिन्हांची जागा बदलून ईव्हीएम मशीन बदललं."

दरम्यान, अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांची लोकसभा मतदारसंघ असलेल्या गुरदासपूरच्या 29 पैकी 29 जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.

या बाबतचं वृत्त the lallan top ने दिलं आहे.

Updated : 18 Feb 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top