Home > Political > Pune : निकालापूर्वीच पुण्यात विजयाचे फ्लेक्स, सर्वत्र एकच चर्चा

Pune : निकालापूर्वीच पुण्यात विजयाचे फ्लेक्स, सर्वत्र एकच चर्चा

Pune : निकालापूर्वीच पुण्यात विजयाचे फ्लेक्स, सर्वत्र एकच चर्चा
X

भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड (kasba and pimpri chinchwad) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत काय होणार? भाजप आपला गड राखणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कसाब पेठ इलेक्शन वेगवेगळ्या कारणाने अगदी आजच्या दिवसापर्यंत गाजत आहे. आता तर पुण्यात मतमोजणी आधीच विजयाचे फ्लेक्स लागले आहे. आता या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अगदी सुरवातीला शहरात पुणेरी पट्यातून सुद्धा अनेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते. उद्या या ठिकाणी मतमोजणी होणार आहे..




पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका आणि पिंपरी चौकात अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स लागले आहेत. आता ही निवडणूक किती प्रतिष्ठेची बनवलेली होती आपण सर्वांनी पहिले. मागच्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक मोठे नेते या ठिकाणी ठाण मांडून होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित, पवार आणि जयंत पाटील यांच्या सोबत महाविकास आघाडीचे अनेक दिगग्ज नेते चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रस्त्यावर उतरले होते. अशा या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. अनेक कारणांमुळे चर्चेत असलेली ही निवडणूक निकालापूर्वीच विजयाचे फ्लेक्स लागल्यामुळे आज देखील या फेल्क्सबाजीमुळे पुन्हा चर्चेत आहे.

Updated : 1 March 2023 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top