Home > Political > ''वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकारायला हवं'' - अमृता फडणवीस

''वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकारायला हवं'' - अमृता फडणवीस

वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकारायला हवं - अमृता फडणवीस
X

पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या म्हणून अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

फडणवीस म्हणाल्या, तुम्ही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील चांगले काम करत आहात. आता या व्यवसायाला सर्वाेच्च न्यायालयानेही पाठींबा दिला आहे. वाईट परिस्थीतीमुळे तुम्ही या व्यवसायात पडला असाल, पण तुम्ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहात. भविष्यात काही वाईट प्रसंग आला तर भाजप तुमच्या पाठीशी आहे, असेही त्या म्हणाल्या.

त्यांच्या मुलांच्या चांगल्या भवितव्या बाबत बोलतांना फडणवीस म्हणाल्या, तुमच्या मुलांना आणि मुलींना तुम्हाला काय करायचे आहे हे ठरवून घ्या. त्यांच्या शिक्षणाची सोय करणे महत्वाचे आहे. या सोबतच तुम्हा आरोग्याची काळजीही तुम्ही घेणे गरजेचे आहे. या व्यवसायामुळे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे त्याची काळजी घ्या, असेही त्या म्हणाल्या.


Updated : 12 Jun 2022 3:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top