Home > Political > "Oh my God, हे पण गुडघे दाखवत आहेत"

"Oh my God, हे पण गुडघे दाखवत आहेत"

‘फटी जीन्स’वाल्या वादावर प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मोहन भागवत यांचे संघाच्या जुन्या पोषाखातील फोटो म्हणाल्या..

Oh my God, हे पण गुडघे दाखवत आहेत
X

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी नुकतीच मुली व महिलांच्या पोशाखांविषयी केलेल्या टीकेवर खळबळ उडाली. अशा बेताल वक्तव्यामुळे सध्या तीरथसिंग रावत चांगलेच ट्रोल होत आहेत. यावर आता कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्वीट केलं आहे.

प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) जुन्या पोषाखातील फोटो पोस्ट केले असून त्याला "असे देवा हे पण गुडघे दाखवत आहेत" अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, तीरथसिंग रावत म्हणाले होते की, एकदा ते विमानाने बाहेर कुठेतरी जात असताना दोन मुलांसह फाटलेल्या जीन्स घातलेली एक स्त्री पाहिली. ती महिला एक स्वयंसेवी संस्था चालवते, तर तिचा नवरा जेएनयूमध्ये प्राध्यापक होता. रावत म्हणाले की अशा महिला आपल्या मुलांना काय संस्कार देणार.

Updated : 19 March 2021 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top