कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव, सभागृहात सत्ताधारी विरोधक आमनेसामने
Max | 15 Dec 2020 8:30 AM GMT
X
X
अभिनेत्री कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या हक्कभंगासंदर्भात समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध कुणी अपशब्द वापरले किंवा आक्षेपार्ह भाषा वापरली तर तो राज्याचा आणि विधिमंडळाचा अवमान आहे, असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच हक्कभंगाचा मुद्दा चर्चेत आला. विरोधी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्तावाला विरोध केला.
Updated : 15 Dec 2020 8:30 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire