Home > Political > पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? बड्या नेत्याच्या पत्नीला उमेदवारी

पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? बड्या नेत्याच्या पत्नीला उमेदवारी

पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? बड्या नेत्याच्या पत्नीला  उमेदवारी
X

ED चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यानतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यामुळे भावना गवळी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळी यांच्या ऐवजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी माहिती असल्याने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यामुळे भावना गवळी यांचा पत्त कट झाल्याचं चित्र पुढे दिसत आहे.

भाजपकडून भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मात्र सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो, "मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते. मी मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही", असे भावना गवळी यांनी ठणकावून सांगितले.

‘मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,’ असेही गवळी यांनी सांगितले. त्यामुळे आता भावना गवळी या महायुतीच्या अधिकृत उमदेवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून अर्ज भरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडुंचा भाजपावर प्रहार

भाजपनं एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये असा प्रहार बच्चू कडूंनी केलाय. भावना गवळींना उमेदवारी कशी मिळेल हे शिंदेंनी पहायला हवं असंही कडूंनी म्हटलंय. बच्चू कडूंच्या वक्तव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय. बच्चू कडूंनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा सल्ला शेलारांनी दिलाय. तर दबावाच्या चर्चा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिलीय.

तुमच्या पाठीमागे उभा आहे यवतमाळ - वाशीम जिल्हा

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची उद्या ४ एप्रिल शेवटची तारीख असतानाही यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या शिंदे सेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार नसल्याची जोरदार चर्चा रंगत असताना "कुणी कितीही करुद्या कल्ला, तुमच्या पाठीमागे उभा आहे यवतमाळ - वाशीम जिल्हा" अशा आशयाचे पोस्टर व्हायरल केले जात आहेत.

भावना गवळी की राजेश्री पाटील

भावना गवळी यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र अद्याप त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. गवळी यांच्या उमेदवारी वरून महायुतीत पेच निर्माण झाला असून त्यांना महायुती तिकीट देणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. गवळी यांना जरी उमेदवारी दिली नाही तरी मात्र महायुतीत हा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला असल्याने इथ शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला उमेदवारी देणार आणि संजय देशमुख विरुद्ध कोण उमेदवार असणार पंतप्रधान मोदींच्या बहिणी भावना गवळी की हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील याची उत्सुकता नागरिकांना लागून आहे.

Updated : 4 April 2024 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top