Home > Political > पंतप्रधान मोदींनी व्हाट्सप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये - ॲड. यशोमती ठाकूर

पंतप्रधान मोदींनी व्हाट्सप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये - ॲड. यशोमती ठाकूर

पंतप्रधान मोदींनी व्हाट्सप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये - ॲड. यशोमती ठाकूर
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने गेल्या दोन दिवसंपासून बोलत आहेत, ते अत्यंत चुकीचे आणि असमर्थनीय आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हिन दर्जाचे राजकारण करू नये. पंतप्रधान पदाची असलेली गरिमा राखावी अशोभनीय वर्तन करू नये अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

गोवा मुक्तिसंग्राम मध्ये कोण लढलं आणि नेमकं काय झालं याचा सर्व इतिहास उपलब्ध आहे, मोदींनी एकदा तपासून पाहावा आणि मगच बोलावे. कारण केवळ संघाच्या शाखेत शिकवला जातो तितकाच इतिहास पंतप्रधान मोदींना माहिती आहे. एखाद्या व्यक्तीची अथवा राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी चुकीचा इतिहास रचून व्हाटसॲप युनिवर्सिटीचं कुलगुरू बनू नये.

काँग्रेसने केलेल्या विकासाचे श्रेय काँग्रेसला न देता केवळ दूषणे देणे मोदी यांचं व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. देशाचा जो काही विकास झाला तो गेल्या सात वर्षात आणि त्यापूर्वी 70 वर्षात काही झाले नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत. कारण त्यांना आता जनतेसमोर जायला कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. सत्ता हातातून जाईल, या भीतीने ते काहीही बरळत आहेत, अशी परखड प्रतिक्रिया ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. देशावर आलेल्या कोरोनाचे संकट काँग्रेसमुळे आलं आणि भाजपमुळे ते गेलं, असे हास्यास्पद पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने करू नयेत, हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना कधीही स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी असले नौटंकी चाळे करावे लागले नाहीत, पंडीत नेहरू हे आंतरराष्ट्रीय नेतेच होते. त्यामुळे त्यांना आपल्या इमेजची चिंता किंवा इमेज बनवण्यासाठी आतासारखी नौटंकी कधी करावी लागली नाही.असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर प्रतिक्रीया देताना ॲड यशोमती ठाकूर यांनी चीन आणि पाकिस्तान चा मुद्दा ही उपस्थित केला. 'मोदींचं आंतराष्ट्रीय धोरण फक्त भाषणापुरतंच आहे. चीन ला लाल आँख दाखवायचं भाषण करायचं आणि भारतात नदी किनारी बसून झोपाळ्यावर झुलायचं ज्यांचं धोरण आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय धोरणावर बोलू नये. गोवा मुक्ती साठी भारताने विविध पातळ्यांवर लढा दिला, प्रसंगी सैन्य वापरण्याची तयारी दाखवली आणि सैन्य दलाला तशा सूचनाही पंडीत नेहरूंनी दिल्या होत्या. पंडीत नेहरू हे आंतरराष्ट्रीय नेतेच होते. त्यामुळे त्यांना आपल्या इमेजची चिंता किंवा इमेज बनवण्यासाठी आताच्या पंतप्रधानांसारखी नौटंकी कधी करावी लागली नाही. मोदींनी भारताच्या हद्दीच चीन ने गावं कशी वसवली, चीन आणि पाकिस्तान मध्ये मैत्री कशी झाली यावर बोलायला हवं. चुकीचा इतिहास रचून व्हाटसॲप युनिवर्सिटीचं कुलगुरू बनू नये.' असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Updated : 8 Feb 2022 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top