Home > Political > "पंकजा ताईंसाठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा.." - प्रवीण दरेकर

"पंकजा ताईंसाठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा.." - प्रवीण दरेकर

पंकजा ताईंसाठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा.. - प्रवीण दरेकर
X

भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,

राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे तीन खासदार निवडून आले असून याचे सर्व यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे जाते. देवेंद्र फडवणीस यांच्या मायक्रो नियोजनामुळे भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप बाजी मारणार व पुढील काळात मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असाही विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला ते आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते.

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार त्यांचा मोठा पराभव झाला हे शिवसेनेचे अपयश आहे. त्यांच्या जागी कोल्हापूरचे धनंजय महाडिक भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडून आले. ही सर्व कमाल भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घडवून आणली पंकजा ताई अजिबात नाराज नाहीत. त्यांच्या साठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा किंवा मोठा प्रश्न नाही नसल्याचं सुद्धा ते म्हणाले..


Updated : 12 Jun 2022 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top