Home > Political > ''महिलांनी राहुल गांधींना मिठी मारली पण मोदी.. '' प्रणिती शिंदेंचा थेट मोदींना टोला

''महिलांनी राहुल गांधींना मिठी मारली पण मोदी.. '' प्रणिती शिंदेंचा थेट मोदींना टोला

महिलांनी राहुल गांधींना मिठी मारली पण मोदी..  प्रणिती शिंदेंचा थेट मोदींना टोला
X

काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा रस्त्यावर चालतात त्यावेळेस अनेक महिला त्यांना मिठी मारतात, त्यांच्या जवळ जातात. त्या महिला यांच्याकडे एक भाऊ म्हणून बघतात. राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते त्यावेळी वयस्कर, तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लोकांमध्ये जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का? खरंतर हाच फरक आहे काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस आहे .त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली त्यावेळेस त्या बोलत होत्या. हे सरकार गोरगरिबांचे सरकार नाही आहे. महिलांचे तर नाहीच नाही. महिलांकडे तुच्छ नजरेने बघणारे हे सरकार आहे. महिलांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. महिलांना न्याय मिळवून देणारे तर दूरच असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली...

काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे पहा..
Updated : 22 Feb 2023 7:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top