Home > Political > ''सुप्रिया सुळे भावी महिला मुख्यमंत्री..'' बॅनरमागचा खरा सूत्रधार कोण?

''सुप्रिया सुळे भावी महिला मुख्यमंत्री..'' बॅनरमागचा खरा सूत्रधार कोण?

सुप्रिया सुळे भावी महिला मुख्यमंत्री.. बॅनरमागचा खरा सूत्रधार कोण?
X

राज्याच्या राजकारणात सध्या काय सुरु आहे आपण पाहतो आहोत. एकीकडे ही चर्चा असताना आता नवीन एका गोष्टीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ती चर्चा आहे सुप्रिया सुळे यांच्या बॅनरची.. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील, अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर मुबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून झळकू लागले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये राष्ट्रवादीतील किती नेते आहेत याचे सध्या जोरदार प्रदर्शन सुरु असल्याचं म्हंटले जात आहे. पण या बॅनर वरून आमच्या नेत्यांच्या यात काही संबंध नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस बोलत आहे. असं असेल तरी ज्या भागात संपूर्ण CCTV आहेत अशा ठिकाणी कार्यकर्ते सोडलं तर कोण हे असे बॅनर लावेल?

सुप्रिया सुळे यांचे बॅनर काय होते?

मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळे यांचा फोटो व नाव असलेला बॅनर लावण्यात आला. महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे नाद नाही करायचा.. असं त्यावरती लिहिलं होतं. आता हा बॅनर नक्की लावला कोणी? त्या पाठीमागचा सूत्रधार कोण? या सगळ्याचा शोध घेणं राष्ट्रवादीने सुरु केले असल्याचं म्हंटल जात आहे. यापूर्वी जयंत पाटील यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून असे फ्लेक्स लागले होते. त्यानंतर काही दिवसातच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या नावाचे असे फ्लेक्स लागले. आता या दोघांनंतर सुप्रिया सुळे यांचे बॅनर लागल्याचं पाहायला मिळत आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. या पोस्टरवरून जोरदार चर्चा सुरू आहे. आता या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. 'हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या त्या बारामती येथे पत्रकारांशी बोलत होत्या..

Updated : 24 Feb 2023 1:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top