Home > Political > Mia khalifa : ट्रोलर्सचे फोटो पोस्ट करत मिया खलीफाने उडवली खिल्ली

Mia khalifa : ट्रोलर्सचे फोटो पोस्ट करत मिया खलीफाने उडवली खिल्ली

Mia khalifa : ट्रोलर्सचे फोटो पोस्ट करत मिया खलीफाने उडवली खिल्ली
X

पुर्व पॉर्न स्टार मिया खलिफाने तिला ट्रोल करणाऱ्यांचा फोटो ट्वीट करत त्यांची खिल्ली उडवली आहे. मिया ने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने तिचा निषेध म्हणून देशात काही ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलकांच्या हातात मिया चा निषेध करणारी पोस्टर आहेत. काही ठिकाणी तर ग्रेटा, रिहाना आणि मिया चे पुतळे देखील जाळण्यात आले.

या आंदोलकांच्या हातात जे पोस्टर आहेत त्या पोस्टरवर "भारत के अंदरूनी मामलों में किसी को हस्तक्षेप की इजाज़त किसी को नहीं." "मिया ख़लीफ़ा होश में आओ" आणि एका पोस्टरवर लिहीलेलं होतं "Mia Khalifa Regains Consciousness" जे मियाचा निषेध नाही तर तिचं समर्थन करतं.

मिया खलीफाने हाच फोटो ट्वीट करत या निषेधकर्त्यांची खिल्ली उडवली. "माझी चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार. पण याची काही गरज नव्हती. मी आजा जागरुक झालेय. आणि मी अजूनही शेतकऱ्यांसोबत आहे." असं मिया ने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


Updated : 5 Feb 2021 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top