Top
Home > Political > "पूजाच्या आई वडीलांनी संजय राठोडकडून 5 कोटी घेवून ते जमीनित पुरले"

"पूजाच्या आई वडीलांनी संजय राठोडकडून 5 कोटी घेवून ते जमीनित पुरले"

“पूजाच्या आई वडिलांना लेकराची किंमत नाही” असा आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे.

पूजाच्या आई वडीलांनी संजय राठोडकडून 5 कोटी घेवून ते जमीनित पुरले
X

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी विरोधी पक्षाने सरकारवर दबाव आणल्यावर संजय राठोड यांना आपल्या कॅबीनेट वन मंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागला. असं असलं तरी पूजाचे आई वडीलांनी पूजाच्या मृत्युची तक्रार दाखल केलेली नाही.

पूजाचे आई वडील तक्रार दाखल करत नाहीत कारण त्यांनी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी एक व्हीडीओ प्रसिध्द केला असून यात त्या "संजय राठोडनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलंय. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. पूजाचे आई-वडील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई-वडिलांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही." असं म्हणत आहेत.


Updated : 1 March 2021 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top