Home > Political > मंत्रिपदाची शपथ घेण्याऱ्या अदिती तटकरे यांच्याविषयी या गोष्टी नक्की जाणून घ्या..

मंत्रिपदाची शपथ घेण्याऱ्या अदिती तटकरे यांच्याविषयी या गोष्टी नक्की जाणून घ्या..

मंत्रिपदाची शपथ घेण्याऱ्या अदिती तटकरे यांच्याविषयी या गोष्टी नक्की जाणून घ्या..
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल त्यांच्या पक्षातील काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही क्षणातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही मोठ्या नेत्यांनी सुद्धा मंत्रीपदाच्या शपथ घेतल्या. यामध्ये या सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी सुद्धा शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्यामुळे त्यांच्यावर वारंवार टीका केली जात होती. सरकारला एक वर्ष झालं तरी सरकारमध्ये एकही महिला मंत्री नव्हती. पण काल ज्या काही सगळ्या घडामोडी झाल्या त्यामध्ये राज्याला या सरकार मधील पहिल्या महिला मंत्री मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अदिती तटकरे नक्की कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण वाचा...

अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व नागरीपुरवठा मंत्री सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. अदिती तटकरे यांनी २००८-०९ मध्ये रायगड जिल्ह्यात स्थानिक राजकारणात एंट्री घेतली. तसचे २००९ साली सुनील तटकरे यांच्यासाठी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारात सक्रीय सहभागही घेतला.

अदिती यांनी २०१२ पासून राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. २०१७ साली रोहा तालुक्यातून रायगड जिल्हा परिषदेवर त्यांची निवड झाली आणि त्यांच्या अधिकृत राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूनही आल्या आणि त्यांना पक्षाने मंत्रीपदही दिलं.

अदिती या विधानसभेतील सर्वात तरुण महिला आमदार आणि मंत्री आहेत. अदिती यांनी एका मुलाखती दरम्यान 'वडील खासदार असल्यामुळे राजकारणात नेहमी घराणेशाहीचा दबाब असतो. मला वडीलांचा अभिमान आहे. मात्र मी जे काही मिळवलं आहे. ते लोकांच्या प्रेमामुळे आणि मी केलेल्या कामांमुळे आहे. घराणेशाहीचा दबाव हा आहे आणि तो असेलही, मात्र मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहाणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करत राहाणार.'

अदिती यांची रायगड, रत्नागीरी आणि नवी मुंबई परिसरात प्रचंड लोकप्रियता आहे. अदिती घराणेशाहीचा आव न दाखवता तळागाळात जाऊन लोकांशी संवाद साधतात, तसेच जनतेच्या हितासाठी सतत झटत असतात. त्यामुळे त्या आम्हाला कायम जवळच्या वाटतात असे श्रीवर्धन तालुक्यातील अनेकांचे म्हणने आहे. अदिती यांनी मंत्री पदाची सुत्र हातात घेताच कामांचा धडाका लावला.

त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. त्यानंतर हे राजकीय नाट्य थांबलं नाही राज्यात दररोज नवनवीन सत्ता नाट्य पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारे काल देखील अचानक विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला व ते आपल्या सहकाऱ्यांसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखीन काही नेत्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये पुन्हा एकदा अदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे आता त्यांच्याकडे नक्की कोणत्या खात्याचा पदभार दिला जातो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल...

Updated : 3 July 2023 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top