- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..
- मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
- ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या
- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
- तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
- वर्षा राऊत ED कार्यालयात, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी..

अजित पवारांची गाडी अडवणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
X
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी आज बीड जिल्हाच्या दौऱ्यावर होते.
यावेळी महिला कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला,असता त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज केल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे.
सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी शेकडो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासून जमा झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. यावेळी महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
यावेळी पोलिसांनी सुरवातीला कर्मचाऱ्यांना गाडी समोरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी जास्त असल्याने सौम्य लाठीमार सुद्धा केला असल्याचं आरोप होत आहे.