Home > Political > प्रियांका गांधी नजरकैदेत; शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असतांना उत्तर प्रदेश सरकारने वाटेतच रोखले

प्रियांका गांधी नजरकैदेत; शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असतांना उत्तर प्रदेश सरकारने वाटेतच रोखले

प्रियांका गांधी नजरकैदेत; शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असतांना उत्तर प्रदेश सरकारने वाटेतच रोखले
X

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा सोमवारी सकाळी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरीला येथे पोहोचणार होत्या, परंतु त्यांना हरगावजवळ ताब्यात घेण्यात आले. रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यांनतर शेतकऱ्यांच्या भेटीसाठी प्रियंका गांधी रात्री 1 वाजता निघाल्या होत्या. मात्र त्यांना पोलिसांनी हरगाव येथून ताब्यात घेत सीतापूर पोलीस लाईनमध्ये नेले असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका गांधी ह्या सकाळी 6 च्या सुमारास लखीमपूर खेरीच्या सीमेवर पोहचल्या होत्या. तर प्रियंका गांधींना शेतकऱ्यांच्या भेटीपासून रोखल्या जाण्याची शक्यता आधीच कॉंग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती. तर अखिलेश यादव आणि इतर नेतेही नजरकैदेत असल्याची माहिती समोर येत आहे.

Updated : 4 Oct 2021 3:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top