Home > Political > पकंजा मुंडे यांना धक्का

पकंजा मुंडे यांना धक्का

पकंजा मुंडे यांना धक्का
X

यावर्षी राज्यातील उसाचा गळीत हंगाम 15 जूनला संपला आहे.त्याचबरोबर यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे .जागतिक पातळीवर ऊस उत्पादनात ब्राझील हा नेहमी उच्च स्तरावर असतो पण यावर्षी भारताने साखरेचे विक्रमी उत्पादन करून साखर आणि उत्पादनात अग्रेसर ब्राझील सारख्या ऊस उत्पादक देशाला सुद्धा मागे टाकले आहे. यामध्ये राज्याचा वाटा अमूल्य आहे.

दरम्यान साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत एफ आर पी जातो कि नाही याबाबत विशेष पाठपुरावा केला असून आत्तापर्यंत 97% एफआरपी चे वाटप झाले आहे तर उर्वरित ठिकाणी साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यात दिवाळीपर्यंत एफआरपी देण्याचे करार सुद्धा झाले आहेत.

पण ज्या कारखान्यांनी 70% पेक्षा कमी एफ आर पी दिला आहे .अशा महाराष्ट्रातील सात कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे .यामध्ये भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश आहे.या कारखान्यांमध्ये पंकजा मुंडे यांचा परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.४६१५.७५ लाख इतकी परळी-आरसीसी रक्कम आहे.

सोलापूर मधील सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना त्यानंतर साताऱ्यातील किसनवीर ससाका भुईंज,बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जय लक्ष्मी शुगर प्रो.नितळी ,उस्मानाबाद तर नगर मधील साईकृपा साखर कारखाना आणि पुण्यातील राजगड सहकारी साखर कारखाना अशा एकूण सहा कारखान्यांना 70% पेक्षा कमी एफ आर पी दिल्याने साखर आयुक्तालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Updated : 29 July 2022 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top