Home > Political > पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले , मंत्रिमंडळ विस्तारनंतर पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा...

पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले , मंत्रिमंडळ विस्तारनंतर पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा...

पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले , मंत्रिमंडळ विस्तारनंतर पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा...
Xमागील महिनाभरापासून राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला असून भाजपचे नऊ तर शिंदे गटाचे नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करणार असल्याची मोठी चर्चा होती.मात्र आपण जर पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना वारंवार डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांना वारंवार डावलले गेल्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते देखील अनेक वेळा आक्रमक झाल्याचं आपण पाहिले आहे.

आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आता राज्यपाल नियुक्त जागांवर नियुक्ती करत त्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदययांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना 🙏🏻..."

Updated : 9 Aug 2022 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top