Home > Political > ''माझं नाव...'' राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया..

''माझं नाव...'' राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया..

माझं नाव... राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया..
X

महाराष्ट्रात राज्यभा निवडणुकीवरुन (rajya sabha election 2022) राजकीय वातावरण तापले असताना भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभा उमेदवारी घोषीत केली आहे. भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, या तिसऱ्या जागेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र त्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही . राज्यसभेसाठी दोन नावे जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नाही आहे, पण ज्यांना उमेदवारी मिळाली त्याचा मला आनंद आहे. कारण पियूष गोयल यांना उमेदवारी मिळणं हे अपेक्षितच होतं, तसेच विदर्भाला संधी मिळाली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या अनिल बोंडे यांना संधी मिळाली त्यांना शुभेच्छा, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांना विधानपरिषदेसाठी इच्छा आहे का? असे विचारले असता, विधान परिषदेबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपनं उमेदवारी जाहीर केली नाही तर राज्यभा निवडणुक बिनविरोध पार पडणार आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चित केले आहे. कॉंग्रेस आणि भाजपने उमेदवार जाहीर केले नव्हते. भाजपने आता आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपकडून पियूष गोयल आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनाही संधी दिली आहे.

तिसऱ्या जागेसाठी भाजपने उमेदवार उतरवला तरी भाजपला 13 मते कमी पडणार आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडुन येणार आहे.

Updated : 30 May 2022 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top