Home > Political > पंकजा मुंडे यांची नाराजी दूर, नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी..

पंकजा मुंडे यांची नाराजी दूर, नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी..

भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. पण आता पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली असल्याचं म्हंटले जात आहे. नक्की काय झालं पाहुयात..

पंकजा मुंडे यांची नाराजी दूर, नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी..
X

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्याच पक्षातील काही लोकांवर नाराज आहेत असं म्हटलं जात होतं. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा होते. मात्र त्यांचा पत्ता कट करत भाजपने उमा खापरे यांना संधी दिली. यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी भाजप विरोधातच जोरदार आंदोलने केली. त्यामुळे पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या वरती नाराज आहेत असं म्हटलं जात होतं. अशा अनेक बातम्या देखील येत होत्या. हे सगळं घडत असताना पंकजा मुंडे देखील शांत होत्या त्यामुळे खरंच त्यांची नाराजी आहे असं म्हंटल जात होतं. पंकजा मुंडेंचा नाराजीच्या चर्चेनंतर आता देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. खरंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरू आहे याचा अंदाज भल्याभल्याना लावता आला नाही.

परवा दिवशी राजभवनावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रम ठिकाणी जात असतानाचा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे या फडणवीस यांना हसत हसत मारताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये नक्की काय किस्सा घडला याचा आवाज काही आपल्याला येत नाही. मात्र ते दोघे काहीतरी बोलत हसत येत असल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर एकच चर्चा आहे की, पंकजा मुंडे यांची देवेंद्र फडनवीस यांच्यावर असलेली नाराजी दूर झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात इतक्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना पंकजा मुंडे या मात्र या सगळ्यांपासून दूर होत्या. मात्र आता परवा दिवशी झालेल्या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी झाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली आहे आणि त्यांना या नव्या सरकारमध्ये महत्त्वाचं खातं देखील मिळू शकतं असं म्हटलं जात आहे.

Updated : 2022-07-02T11:37:51+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top