Home > Political > "उमेदचे बाजारीकरण तात्काळ थांबवा" पंकजा मुंडे यांचे सरकारला आवाहन

"उमेदचे बाजारीकरण तात्काळ थांबवा" पंकजा मुंडे यांचे सरकारला आवाहन

उमेदचे बाजारीकरण तात्काळ थांबवा पंकजा मुंडे यांचे सरकारला आवाहन
X

राज्यातील उमेद अभियानाचे त्रांगडे वाढत चालले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत लाखो महिला बचत गटांच्या आर्थिक उलाढालीवर त्याचे सावट येत आहे. राज्य सरकारने या अभियानातील कंत्राटी कर्मचारी कामवरून काढून टाकले आहेत. हे अभियान त्रयस्थ संस्थेच्या हाती देण्याच्या निर्णयदेखील पूर्णपणे अंमलात आलेला नाही. त्यामुळे आता राज्यातील बेरोजगार झालेल्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

उमेदचे हे बाजारीकरण थांबवण्याचे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला केले आहे. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, "आमच्या सरकारच्या काळात उमेद अभियानाच्या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतली होती. त्यांनी अभियानातील महिलांशी ऑनलाईन संवाद साधला होता. तसेच यवतमाळ व औरंगाबाद येथे लाखो महिलांच्या मेळाव्याला संबोधितही केले होते. उमेदने आपल्या कामातून राज्याला अनेक पहिल्या -दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कारही मिळवून दिले आहेत. लाखो गरीब- वंचीत महिलांना आपल्या पायावर उभ्या केलेल्या उमेदचे बाजारीकरण या सरकारने तात्काळ थांबवावे. आज मागच्या 4 महिन्यांहून अधिक काळापासून या महिला आपल्या अस्तितवासाठी रस्त्यावर उतरून लढा आहेत, सरकारने अजून महिलांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये."


Updated : 2020-12-16T14:59:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top