Home > Political > पंकजा मुंडेंना मंञीपद?

पंकजा मुंडेंना मंञीपद?

पंकजा मुंडेंना मंञीपद?
X

भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. पण आता पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली असल्याचं म्हंटले जात आहे. या सरकारमध्ये त्यांना मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते असं म्हंटल जात आहे. या सगळ्या बाबत भाजपच्या एका नेत्याने सुद्धा वक्तव्य केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना संधी मिळणार की पुन्हा डावलले जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्याच पक्षातील काही लोकांवर नाराज आहेत असं म्हटलं जात होतं. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा होते. मात्र त्यांचा पत्ता कट करत भाजपने उमा खापरे यांना संधी दिली. यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी भाजप विरोधातच व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केली. त्यामुळे पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या वरती नाराज आहेत असं म्हटलं जात होतं. अशा अनेक बातम्या देखील येत होत्या. हे सगळं घडत असताना पंकजा मुंडे देखील शांत होत्या त्यामुळे खरंच त्यांची नाराजी आहे असं म्हंटल जात होतं. पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चेनंतर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ समोर आला. तो व्हिडिओ पाहता या दोघांमध्ये कोणतीही नाराजी नसावी किंवा असेल तर ती दूर झाली आल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

या चर्चेनंतर पंकजा मुंडे यांना या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना 12 आमदारांची यादी देण्यात आली होती. पण जवळपास पावणेदोन वर्ष गेल्यानंतर देखील राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नाही. अद्याप या बारा नावांना मंजुरी देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळाला.

आता शिंदे ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर हे सरकार देखील संबंधित 12 जागांसाठी नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या राज्यपाल नियुक्त यादीत पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. भाजपचे नेते आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्यांना संधी मिळावी, पण भारतीय जनता पक्षात ज्या पद्धतीने निर्णय होतात, त्यानुसार मी खूप छोटा आल्याच म्हणत कार्यकर्त्यांची पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी मिळावी अशी इच्छा असल्याचे काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना संधी मिळते का? आणि मिळाली तर त्यांना पक्षाकडून काही मोठी जबाबदारी मिळणार का? मिळाली तर नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यामच्या स्थान काय असणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Updated : 7 July 2022 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top