Home > Political > ओबीसी मोर्चाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे नाराज नाहीत; बावनकुळेंच स्पष्टीकरण

ओबीसी मोर्चाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे नाराज नाहीत; बावनकुळेंच स्पष्टीकरण

ओबीसी मोर्चाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे नाराज नाहीत; बावनकुळेंच स्पष्टीकरण
X

भाजपमधील राज्यातील दोन मोठे ओबीसी चेहरे ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पुन्हा नाराजीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले असून, आम्ही दोन्ही नाराज नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असतानाच, सोमवारी झालेल्या भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणच्या बैठकीत पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे देखील अनुपस्थित राहिले. पक्षाचे राज्यातील दोन मोठे ओबीसी चेहरे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पुन्हा नाराजीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र यावर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले असून, आम्ही दोन्ही नाराज नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी कालपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सकाळपासून नागपूरहून निघालो आहे, सात दिवसाचं हे नियोजित दौरा असल्याने मी बैठकीला गेलो नसल्याचं बावनकुळे म्हणाले. तसेच पंकजा मुंडे ह्या सुद्धा नियोजित कार्यक्रमात होत्या, यामुळे त्या सुद्धा बैठकीला हजर राहू शकल्या नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत नाही, त्यांनी हे आधीच स्पष्टपणे सुद्धा सांगितलं असल्याचं बावनकुळे म्हणाले.

Updated : 20 July 2021 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top