Home > Political > VIDEO - पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न...

VIDEO - पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न...

विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यामुळे पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न..

VIDEO - पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न...
X

माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे त्यांनी विष प्रशांत केल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी दिसत आहे. आज औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवले आणि हल्ल्याचा प्रयत्न रोखला. आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी आता स्पष्ट दिसत आहे.

Video

Updated : 9 Jun 2022 2:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top