Home > Political > आमदार फोडण्याबाबत पंकजा मुंडे यांचे वक्तव्य, सर्वत्र एकच चर्चा...

आमदार फोडण्याबाबत पंकजा मुंडे यांचे वक्तव्य, सर्वत्र एकच चर्चा...

आमदार फोडण्याबाबत पंकजा मुंडे यांचे वक्तव्य, सर्वत्र एकच चर्चा...
X

राज्याचा राजकारणात जे काही घडत आहे त्याची देशभर चर्चे आहे. राज्यात झालेले सत्ता परिवर्तन त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ हे सर्व घडण्या आगोदर गेल्या महिन्याभराच्या काळात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा होती. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षात बंड केला आणि आपल्या सोबत चाळीसहून अधिक आमदार घेऊन जात भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एका कार्यक्रमात तुम्ही कधी आमदार फोडले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर पंकजा मुंडे यांनी अत्यंत स्मित हास्य करत "एक एक आमदार की किंमत तुम क्या जानोगे सुबोध बाबू.." असं उत्तर दिलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.

नुकत्याच झी मराठी वाहिनीवर पार पडलेल्या 'बस बाई बस' या टीव्ही कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे पंकजा मुंडे यांना प्रश्न करतात की, तुम्ही कधी आमदार फोडले आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर सेटवर सर्वांनाच पंकजा मुंडे काय उत्तर देणार याकडे लक्ष लावून होते. त्यांनी या प्रश्नाला अगदी फिल्मी स्टाईलने उत्तर देत सेटवर तुफान फटकेबाजी केले आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांना राजकारणाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम कधी येणार आहे याची उत्सुकता आहे. यापूर्वी या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सहभागी झाल्या होत्या...

Updated : 11 Aug 2022 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top