Home > Political > संजय राठोडांप्रमाणे धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी

संजय राठोडांप्रमाणे धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी

संजय राठोडांप्रमाणे धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी
X

आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा असं वाटतं का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा असं मत व्यक्त केलं आहे.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता याची चौकशी व्हावी आणि पूजाला न्याय मिळावा अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली. संजय राठोड यांनी फार आधी पदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही असं म्हणत चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातला गेलाच पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Updated : 1 March 2021 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top