Home > Political > पंकजा मुंडे योग्य ट्रॅकवर?

पंकजा मुंडे योग्य ट्रॅकवर?

विधानसभा निवडणूकीनंतर पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे एकनाथ खडसेंसोबत पक्ष सोडणार असं बोललं जात होतं. सध्या खडसेंनी पक्ष सोडला असला तरी पंकजा मुंडे या अजूनही भाजपसोबतच आहेत. त्यातच आता त्यांनी केंद्रातील मंत्र्यांचे आभार मानल्याने पंकजा मुंडे योग्य ट्रॅकवर असल्याच्या चर्चा आहेत..

पंकजा मुंडे योग्य ट्रॅकवर?
X

बीड-अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. सध्या तिथे रेल्वेचे रुळ बसवण्याचे काम सुरु असुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रुळावर उभ राहून फोटो काढला. हा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर पोस्ट केला आणि चर्चे सुरु झाली 'पंकजा मुंडे योग्य रुळावर?' ची. ही चर्चा का सुरु झाली याचा घेतलेला थोडक्यात आढावा..

स्वपक्षावर नाराज पंकजा..

विधानसभा निवडणूकीती पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे त्यांच्याच पक्षाच्या लोकांचा हात असल्याचं बोललं जात होतं. तर दुसऱ्या बाजुला एकनाथ खडसे "आपल्याला डावललं जातय" असं म्हणत उघड उघड आपली नाराजी व्यक्त करत होते. पंकजा मुंडेंनी सावरगाव येथील भगवानगडावर दसरा मेळाव्या निमीत्त केलेल्या भाषणात. "रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे सजग राहावेच लागेल. आपली वज्रमूठ कायम असेल तर मोठी सत्ताही हादरते हे नेहमीच लक्षात राहू द्या." असं सुचक विधानही केलं होतं.

पक्षांतराच्या चर्चा..

याच नाराजीतून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. पण नंतर चर्चा सुरु झाली ती 'खडसे गेले पंकजा मंडेंचं काय?' त्यातच दसरा मेळाव्याच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी "मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचंय" असं म्हटल्याने त्या शिवसेनेत प्रवेष करणार असल्याचं बोललं जावू लागलं.

पक्षाकडून राष्ट्रीय कार्यकारिणीत जबाबदारी आणि दौरे..

नाराज पंकजा मुंडेंना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देणात आली. या नियुक्ती नंतर पंकजा यांनी दौऱ्या सुरुवात केली. त्यांनी रायगड, भोपाळ, सीहोर (मध्य प्रदेश), उजैन, इंदोर अशा विवीध ठिकाणी भेटी दिल्या. व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

योग्य ट्रॅकवर?..

पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राजकारणात पुन्हा एकदा सक्रीय झालेल्या पंकजा मुंडेंनी आता बीड-अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला 527 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने त्यांनी रेल्वे रुळावर फोटो काढून तो सोशल मीडिया हॅंडलवर पोस्ट केला. या फोटोला त्यांनी "स्वप्न साकार होतय" असं कॅप्शन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत.

त्यांच्या याच पोस्टमुळे सध्या 'पंकजा योग्य मुंडे ट्रॅकवर?' अशा चर्चा सुरु आहेत.

Updated : 11 Feb 2021 4:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top