Home > Political > अमित शहांच्या फोननंतर पंकजा मुंडे 'ऑन ग्राउंड'

अमित शहांच्या फोननंतर पंकजा मुंडे 'ऑन ग्राउंड'

अमित शहांच्या फोननंतर पंकजा मुंडे ऑन ग्राउंड
X

गेल्या अनेक काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येत असून, बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र अनेक दिवसांपासून फिल्डवर न दिसणाऱ्या पंकजा मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्ताने आलेल्या फोननंतर पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पंकजा मुंडे गेली काही दिवस पक्षाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या ओबीस सेलच्या बैठकीत सुद्धा त्यांनी पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा झाली. मात्र 26 तारखेला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने थेट अमित शहांचा फोन आला होता. यावेळी पंकजा मुंडे आणि शहा यांच्यात चर्चा झाली. पण वाढदिवसाच्या पलीकडे काय चर्चा झाली याबाबत कोणतेही माहिती समोर आली नाही. पण त्यांनतर पंकजा मुंडे सक्रीय झाल्या असून,त्या मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी पंकजा मुंडे परळीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसल्या. यावेळी त्यांनी एका लग्न समारंभात हजेरी लावली,तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी जनता दरबारला सुद्धा हजेरी लावली,तसेच गुरुवारी सुद्धा त्यांनी साईप्रेम प्रतिष्ठान आयोजित 'चला खेळू खेळ पैठणीचा' या वेगळ्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे नाराज पंकजा पुन्हा एकदा सक्रीय झाल्याची चर्चा बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

Updated : 30 July 2021 2:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top