Home > Political > ''भाजप थोडीच माझा पक्ष आहे..'' पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय? | Pankaja Munde

''भाजप थोडीच माझा पक्ष आहे..'' पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय? | Pankaja Munde

भाजप थोडीच माझा पक्ष आहे.. पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय? | Pankaja Munde
X

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी मागच्या काही काळापासून या ना त्या कारणातून नेहमी समोर येत राहिली आहे. आता पंकजा मुंडे यांनी असं काही वक्तव्य केले आहे त्यातून पुन्हा एकदा त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे असं नक्की काय म्हणाल्या ज्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा आहे हेच आपण जाणून घेणार आहोत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी मंचावर पंकजा मुंडे या सुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमात पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी भाषणात काही सूचक विधाने केली. ''भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे'' असं एक विधान यावेळी त्यांनी केलं आणि त्याच विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. या विधानापाठीमागचे नक्की अर्थ काय आहे पाहुयात..

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याचं वारंवार म्हटलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना डावलत असल्याचा थेट आरोप मुंडे समर्थकांनी याआधी अनेक वेळा केला आहे. पण पंकजा मुंडे यांनी या नाराजीवर कधी उघड बोलून दाखवले नाही. आज आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्या बोलण्यातून त्यांची नाराजी उघड असल्याचं म्हंटल जाऊ लागलं आहे. या कार्यक्रमात काय घडलं तर सुरुवातीला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्या पक्षाने काय काय केलं याविषयी सांगितलं हाच मुद्दा पंकजा मुंडे यांनी पकडत त्यांच्या भाषणात ''भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन भाजपा बनलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं'' असं म्हणत केंदीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासमोरच त्यांनी स्वपक्षालाच चिमटे काढले. इतकं बोलून मुंडे थांबल्या नाहीत त्यांनी पुढे बोलताना “मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे”, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी भाजपला केला आहे..

आता या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नाराजी बाबत चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..


Updated : 2 Jun 2023 12:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top