Home > Political > स्वतः कोणत्या आमदारांना फोडले पंकजा मुंडेंनी केला खुलासा..

स्वतः कोणत्या आमदारांना फोडले पंकजा मुंडेंनी केला खुलासा..

स्वतः कोणत्या आमदारांना फोडले पंकजा मुंडेंनी केला खुलासा..
X

राज्याचा राजकारणात जे काही घडत आहे त्याची देशभर चर्चे आहे. राज्यात झालेले सत्ता परिवर्तन त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ हे सर्व घडण्या आगोदर गेल्या महिन्याभराच्या काळात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा होती. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षात बंड केला आणि आपल्या सोबत चाळीसहून अधिक आमदार घेऊन जात भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एका कार्यक्रमात तुम्ही कधी आमदार फोडले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर पंकजा मुंडे यांनी अत्यंत स्मित हास्य करत 'हो...' असं उत्तर दिले. त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर निवेदकाने त्यांना लगेच कोणत्या आमदारांना तुम्ही फोडले आहे? असा प्रश्न विचारला त्यानंतर मग उत्तर देताना त्यांनी काही आमदारांची नावे सांगितली.

नुकत्याच झी मराठी वाहिनीवर पार पडलेल्या 'बस बाई बस' या टीव्ही कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे पंकजा मुंडे यांना प्रश्न करतात की, तुम्ही कधी आमदार फोडले आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर सेटवर सर्वांनाच पंकजा मुंडे काय उत्तर देणार याकडे लक्ष लावून होते. त्यानंतर त्यांनी मी अनेकांचा भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश केला असल्याचं म्हणात यामध्ये नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश देऊन त्यांना आमदार केलं. त्याच बरोबर इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिला असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी वडिलांनी मला नेहमी बेरजेच राजकारण करायला शिकवलं वाजबाकीचे नाही त्यामुळे राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या.


या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांना राजकारणाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम कधी येणार आहे याची उत्सुकता आहे. यापूर्वी या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सहभागी झाल्या होत्या...

Updated : 12 Aug 2022 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top