Home > Political > पंकजा मुंडे आता मोदींच्या भेटीला...

पंकजा मुंडे आता मोदींच्या भेटीला...

पंकजा मुंडे आता मोदींच्या भेटीला...
X

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली असतानाच, पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता पंकजा मुंडे ह्या मोदींच्या भेटीला त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी पोहोचल्या आहेत.

प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली नसल्यामुळे मुंडे बहिणी नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. असं असताना दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर सहभागी झाले होते. ही बैठक तासभर चालली. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी पंतप्रधान मोदींच्या भेटीला 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी पोहोचले आहेत.

त्यामुळे मोदींच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांची नाराजी दूर होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच भेटीनंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया काय असेल, ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 11 July 2021 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top