Home > Political > पंकजा मुंडे वरळीच्या कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांना काय आदेश देणार?

पंकजा मुंडे वरळीच्या कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांना काय आदेश देणार?

पंकजा मुंडे वरळीच्या कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांना काय आदेश देणार?
X

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रितीम मुंडे (pritam munde) यांना संधी न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोलले जात आहे. त्यातच मुंडे समर्थकांच राजीनामा सत्र काही थांबायला तयार नाही. यासर्व घडामोडींवर आज पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांच्याकडून खुलासा केली जाण्याची शक्यता असून, पंकजा मुंडे काही वेळापूर्वी आपल्या वरळीच्या कार्यालयात दाखल झाल्या असून, त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते कालपासूनच मुबईत दाखल झाले आहे. यासर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पंकजा मुंडे आपली भूमिका स्पष्ट करतील असे बोलले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे ( pankaja munde ) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे आपल्या वरली कार्यालयात येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत 'कोण आली री कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली',अशा घोषणा दिल्या. तसेच पंकजा मुंडे यांच्या निर्णयाकडे या सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Updated : 13 July 2021 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top