Home > Political > "त्यांनी मोठेपणा दाखवला नाही पण आम्ही दाखवू" पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला...

"त्यांनी मोठेपणा दाखवला नाही पण आम्ही दाखवू" पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला...

‘’आज त्यांनी मोठे पणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू, मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा..

त्यांनी मोठेपणा दाखवला नाही पण आम्ही दाखवू पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला...
X

बीड मधील मुंडे बहिण भावात आज पुन्हा आरोप प्रत्यारोप पहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्र्वर या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याच निमित्ताने या बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगले. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो प्रत्येक कोनशिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचे आज त्यांनी मोठे पणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू, मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधला आहे. नेमक्या काय म्हणा ल्या पंकजा मुंडे पाहुयात.

Updated : 20 March 2022 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top