Home > Political > पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची बाधा

पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची बाधा

पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची बाधा
X

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉची बाधा झाली आहे. पंकजा मुंडे यांना सौम्य लक्षणं असून सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्यात.

पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत ट्विट करतमाहिती दिली. त्या म्हणाल्या, "करोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी."

राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. सोबतच, ओमिक्रॉनचे रूग्ण देखील वाढले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कडक पावलं उचलायला सुरुवात केली असून, निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.काल दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन कोरोनाबाधित आढळल्याचं समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. तर राज्यात काल सात कोरोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

Updated : 2 Jan 2022 3:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top