Home > Political > पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक; मोठा निर्णय घेतील का?

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक; मोठा निर्णय घेतील का?

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक; मोठा निर्णय घेतील का?
X

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली असतानाच, पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

त्यातच आता पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे. कालपर्यंत पंकजा मुंडे काय निर्णय घेणार अशी चर्चा सुरु असतानाच, आता पंकजा यांची दिल्ली वारी राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड समजली जात आहे. त्यात पंकजा मुंडे यांनी 13 जुलै (मंगळवार) रोजी पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली असल्याची माहिती, राजेंद्र मस्के यांनी माध्यमांना दिली आहे.

त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार, पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी दूर करणार की आणखी काही मोठा निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे 13 तारखेला होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दिल्लीतील चर्चेची माहिती सुद्धा पंकजा मुंडे याच बैठकीनंतर देतील अशीही चर्चा पाहायला मिळत आहे.

तर, नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता अधिक होती. विशेष म्हणजे त्याचं नावही चर्चेत होते. मात्र, अचानक डॉ. भगवानराव कराड यांचं नाव आल्यानं मुंडे समर्थकांमध्ये मोठा राग आहे. त्यामुळे अनेक समर्थक आपला संताप सोशल मिडियावरून मांडत आहे.

Updated : 11 July 2021 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top