Home > Political > 'बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे' फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

'बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे' फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका
X

नांदेडच्या देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक थेट एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले असून, रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. तर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकाचा चांगलाच समाचार घेतला, 'बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे' असा खोचक टोला यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, दोन वेळा अतिवृष्टी झाली, पण अजूनही शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही, शेतविम्याचे पैसे दिलेले नाहीत. काही झालं की फक्त केंद सरकारकडे बोट दाखवायचं. यांना बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्र सरकारचा हात आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर राज्य सरकारने त्यांच्याकडील १७०० कोटींचा प्रीमियरच भरला नसल्याने विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देऊ शकत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे सतराशे कोटी का भरले नाही हे या लबाडांना विचारायला हवे असेही फडणवीस म्हणाले


Updated : 25 Oct 2021 1:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top