Home > Political > अमृतमहोत्सवच्या 'त्या' पोस्टरवरून यशोमती ठाकूर संतापल्या; खोचक शब्दात घेतला समाचार

अमृतमहोत्सवच्या 'त्या' पोस्टरवरून यशोमती ठाकूर संतापल्या; खोचक शब्दात घेतला समाचार

नेहरूंचे विचार हे देशाला वाचवण्यासाठी अमृत आहे जे मोदींना कधीच समजणार नाही. यशोमती ठाकूर यांची 'त्या' पोस्टर वरून मोदींवर टीका...

अमृतमहोत्सवच्या त्या पोस्टरवरून यशोमती ठाकूर संतापल्या; खोचक शब्दात घेतला समाचार
X

भारतीय इतिहास संशोधन परिषदेने 'स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव' या संदर्भातील एक पोस्टर प्रसिद्ध केल आहे. या पोस्टर मध्ये जवाहरलाल नेहरू यांचा फोटो नसल्याने आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ओअ. यशोमती ठाकूर यांनी देखील या गोष्टीवर आक्षेप घेत टीका केली आहे. त्यांनी तो फोटो ट्विट करून म्हंटल आहे की, 'बिना टिके के टिकामहोत्सव, बिना अमृत के अमृत महोत्सव !! नेहरू जी का विचार इस देश को बचानेवाला वो अमृत है जो मोदीजी को कभी समझ नहीं आएगा !!

नेहरूंचे विचार हे देशाला वाचवण्यासाठी अस अमृत आहे की जे मोदींना कधीच समजणार नाही. अशी टीका. Adv. ठाकूर यांनी केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याविषयी आक्षेप घेतला आहे. या पोस्टर मध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि सावरकरांचा फोटो आहे. मात्र यामध्ये नेहरुंचा फोटो नसल्याने आता त्यांच्यावर ती टीका केली जात आहे.

Updated : 29 Aug 2021 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top